Ad Code

Responsive Advertisement

राज्यातील महानगरपालिका नगरपालिका निवडणूक ह्या महिन्यात होणार; राज्य निवडणूक आयोग यांनी यांनी काढला राजपत्र

राज्यातील महानगरपालिका नगरपालिका निवडणूक ह्या महिन्यात होणार;  राज्य निवडणूक आयोग यांनी यांनी काढला राजपत्र
मुंबई :- राज्यातील रखडलेल्या व मुदत संपलेल्या माहे सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकां ह्या मतदार याद्या तयार करण्यासाठी दि. १ जुलै २०२३ या दिवशी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्यांनुसारच करण्यात याव्यात असा आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उप सचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी काढला असुन त्यानुसार आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यानुसार आता आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपरिषदचेच्या सार्वत्रिक निवडणुकीचाही मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे निवडणूका होऊन प्रशासकाच्या हातातील कारभार लोकप्रतिनिधींच्या हातात येऊन शहराच्या स्थांबलेल्या विकास कामांना चालना मिळून नागरिकांच्या नागरी समस्या सुटून त्यांची समस्यांमधून सुटका होणार असल्याचे दिसून येत आहे. निवडणूकीसाठी लागणाऱ्या मतदार याद्यांबाबत जरी आदेश निघाला असला तरी निवडणूका कोणत्या कालावधीत होणार याचा स्पष्ट उल्लेख सदर आदेशात असून माहे सप्टेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत होणार असे त्यातुन दिसून येत आहे. हा आदेश महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उप सचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी काढला असुन त्यानुसार आता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement