खिदमत ए खल्क फाऊंडेशन उस्मानाबाद च्या वतीने अल्पसंख्यांक समाजातील 10 वी, 12वी, Neet 2023 मधील गुणवंत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा सत्कार एम.के.फंक्शन हाॅल येथे करण्यात आला
उस्मानाबाद :- दिनांक 27जुन 2023 मंगळवार रोजी उस्मानाबाद शहरातील अल्पसंख्याक समाजातील 10वी, 12वी, Neet 2023 मधील गुणवंत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा सत्कार खिदमत ए खल्क फाॅऊंडेशन च्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मौलाना अब्दुल्ला कासमी, प्रमुख पाहुणे डॉ. शेख गाझी सर ( प्रींसीपल आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसी, गडपाटी, उस्मानाबाद), मौलाना अयुब सहाब रश्दी ( जमीयत उलेमा ए हिंद उस्मानाबाद माजि जिल्हा अध्यक्ष), शेख मैनोद्दिन पठाण ( माजी नगराध्यक्ष उ'बाद व जिल्हा अध्यक्ष मोटर मालक संघ ) डॉ. सलीम नालबंद ( सुप्रसिद्ध डाॅक्टर उस्मानाबाद), मौलाना शौकत अली ( माजी सचिव जमियत उलेमा एक हिंद उ'बाद ), शेख रियाज सर (प्रमुख अल कलम स्टडी सेंटर), शेख मैनोद्दिन खर्ची (सामाजिक कार्यकर्ते ), सिद्दिकी मुबारेसोद्दिन ( अध्यक्ष शालेय शिक्षण समिती प्रियदर्शनी स्कूल) यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पसंख्याक समाजातील Neet 2023 मध्ये मोमीन मो. आवेज 574 गुण घेऊन जिल्ह्यात प्रथम आला तर शेख इंजिला फलक इसरार 572 गुण , शेख फैजान मंदार 562 गुण तर एस.एस.सी. मध्ये पल्ला रिमशा मुस्तफा 99.40% प्रथम, रजवी इब्राहिम 96.00% द्वितीय, तसेच एच.एच.सी. पटेल मुख्तार 82.00% प्रथम घेणार्या अल्पसंख्यांक गुणवंत विद्यार्थ्यां सहित 50 विद्यार्थ्यांंचा सत्कार खिदमत ए खल्क फाऊंडेशन च्या वतीने, मेडल, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
कार्यक्रमाची प्रस्तावना फॉन्डेशन चे सदस्य मौलाना शौकत तर सुत्र संचालन अध्यक्ष शेख नुरोद्दिन इंजिनिअर तसेच अभार प्रदर्शन सचिव शेख जावेद यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, सरदार मुजावर, शेख वजिर, मोमीन फहीम, सय्यद जाकेर, सय्यद अजमत, सय्यद फजल, शेख हामीद, शेख रौफ यांनी परिश्रम घेतले.
0 Comments