कौटुंबिक वादातून मुलाने केला बापाचा खून धाराशिव जिल्ह्यातील घटना
परंडा पोलीस ठाणे: आरोपी नामे-विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे, वय 30 वर्षे, रा. अंतरगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 08.08.2024 रोजी 21.00 वा. सु.अंतरगाव येथील बाणगंगा नदी पात्रात मयत नामे- विक्रम निवृत्ती गोरे, वय 55 वर्षे, रा. अंतरगाव ता. भुम जि. धाराशिव यांना कौटुंबिक वादाचे कारणावरुन नमुद आरोपीने मारहाण करुन गळफास देवून जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी फिर्यादी नामे-राहीबाई विक्रम गोरे, वय 48 वर्षे, रा. अंतरगाव ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.10.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 103(1), 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments