Ad Code

Responsive Advertisement

दिवसा घरफोडी करणारा आरोपी गजाआड – धाराशिव शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

दिवसा घरफोडी करणारा आरोपी गजाआड – धाराशिव शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
धाराशिव: शहरातील एका घरफोडी प्रकरणात धाराशिव शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

गुन्ह्याचा घटनाक्रम:
दि. 25 ऑक्टोबर 2024 रोजी राहुल राजाभाऊ यादव (वय 37, रा. विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ, धाराशिव) हे सकाळी 9 ते 11 वाजताच्या दरम्यान घराला कुलूप लावून कामावर गेले असता, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील 12,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातील फुले व 4,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 16,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 451/2024 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 331(3), 305(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची जलद कारवाई:
पोलिसांनी तपासादरम्यान गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यात सौरभ हरिदास काळे (रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) याचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले. तातडीने पोलिसांनी त्याला वाकी, ता. आष्टी, जि. बीड येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मुद्देमाल जप्त:
आरोपीकडून

7,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातील फुले

4,000 रुपये रोख रक्कम

गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकल (MH-23-BJ-8112), अंदाजे किंमत 1,00,000 रुपये


असा एकूण 1,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस तपास सुरू:
आरोपीकडे अधिक तपास सुरू असून त्याच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

उल्लेखनीय कामगिरी:
या यशस्वी कारवाईसाठी धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, ग्रेड पोलीस निरीक्षक देविदास हावळे, पोहेकॉ पठाण, पोअं जमादार, मपोअं देशमुख यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

धाराशिव पोलिसांच्या या तडफदार कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement