Ad Code

Responsive Advertisement

ग्रामपंचायत कार्यालय वडगाव (काटी)ग्रामसभेचा अभाव आणि मनमानी कारभाराविरोधात तक्रार; चौकशी पुढे ढकलली

ग्रामपंचायत कार्यालय वडगाव (काटी)ग्रामसभेचा अभाव आणि मनमानी कारभाराविरोधात तक्रार; चौकशी पुढे ढकलली
तुळजापूर, ७ फेब्रुवारी २०२४ – मागील चार वर्षांपासून ग्रामसभांचा अभाव आणि मनमानी कारभारावर ग्रामपंचायत सदस्य निलाबाई डोके यांनी पंचायत समिती तुळजापूरकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला की, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी एकही ग्रामसभा वा मासिक सभा घेतली नाही. गावातील नागरिकांच्या नकळत खोट्या सह्या करून बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली.

या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीसाठी पंचायत समितीचे तांबोळी साहेब गावात आले असता, मागील चार महिन्यांपासून गैरहजर असलेल्या ग्रामसेवक शेखदार मॅडम उपस्थित होत्या. मात्र, सरपंच, उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे तांबोळी साहेबांनी चौकशी पुढे ढकलली आणि पुढील चौकशी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याचे लेखी पत्र निलाबाई डोके यांना दिले.

आता पंचायत समिती सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांवर कोणती कारवाई करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement