Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव शहरामध्ये वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई

धाराशिवमध्ये वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेवर पोलिसांची कारवाई
धाराशिव (प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरामध्ये वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत एक महिलेला ताब्यात घेतले. या प्रकरणी सदर महिलेविरुद्ध मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. 27 फेब्रुवारी 2025 रोजी गस्तीदरम्यान पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, धाराशिव शहरातील शेकापुर रोड, बालाजी नगर येथे एक महिला काही महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत आहे.

पोलिसांनी खात्री करण्यासाठी एका बनावट ग्राहकाला पाठवले. माहिती खरी असल्याचे लक्षात येताच दुपारी 2.55 वाजता पोलिसांनी छापा टाकून संबंधित महिलेला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी महिलेचे नाव रत्नमाला सतीश मदने (वय 46, रा. शेकापुर रोड, बालाजी नगर, धाराशिव) असल्याचे समोर आले. ती महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम 7,900 रुपये आणि निरोधची पाकिटे असा एकूण 7,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेस सुटका करून आरोपी रत्नमाला मदने हिच्यावर गुन्हा क्रमांक 92/2025 भा.दं.वि. कलम 143, 144 सह मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 4, 5, 7 नुसार धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हवालदार विनोद जानराव, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, शोभा बांगर, पोलीस नाईक बबन जाधवर, नितीन जाधवर, चालक पोहेकॉ महेबुब अरब, विजय घुगे, पोलीस अमंलदार दहिहांडे आणि धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे सपोफौ (108) पुरके यांच्या पथकाने केली.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement