Ad Code

Responsive Advertisement

"तुकाराम मुंडे धाराशिव जिल्हाधिकारी? सोशल मीडियावर अफवा, अधिकृत घोषणा नाही"

धाराशिव जिल्हाधिकारी पद रिक्त, तुकाराम मुंडे यांच्या बद्दलची माहिती अफवा
धाराशिव जिल्हाधिकारी सचिन ओम्बसे यांची बदली सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी झाली आहे. मात्र, सध्या धाराशिव जिल्हाधिकारी पदासाठी कोणाचीही अधिकृत नियुक्ती झालेली नाही.

दरम्यान, समाजमाध्यमांवर वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची धाराशिव जिल्हाधिकाऱी म्हणून नियुक्ती झाल्याची अफवा पसरत आहे. मात्र, राज्य शासनाकडून अशा कोणत्याही नियुक्तीची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये 

राज्य शासन लवकरच धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement