Ad Code

Responsive Advertisement

धाराशिवमध्ये शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन युवकांवर गुन्हा दाखल
धाराशिव : शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन युवकांविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1 वाजता माऊली चौक, धाराशिव येथे आदित्य किशोर मुंढे (वय 19, रा. कोट गल्ली, धाराशिव) हा तलवार जवळ बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून 1,500 रुपये किंमतीची तलवार जप्त केली. तसेच, त्याच दिवशी दुपारी 2 वाजता रामराजे चौक, भोसले हायस्कूलसमोर, धाराशिव येथे ऋषीकेश राजेश शिंदे (वय 20, रा. आरणी, धाराशिव) याच्याकडेही तलवार सापडली.

या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध शस्त्र कायदा कलम 4, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अंतर्गत धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement