Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव पोलिसांची धडाकेबाज कारवाई – गुटख्याच्या गुडाऊनवर छापा, हजारोचा मुद्देमाल जप्त!

धाराशिव पोलिसांची धडाकेबाज कारवाई – गुटख्याच्या गुडाऊनवर छापा, हजारोचा मुद्देमाल जप्त!
शेख जाफरोद्दीन रब्बानी (युवा मशाल न्यूज )

धाराशिव | दिनांक: २८ जून २०२५
धाराशिव शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुट्टखा/पान मसाल्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक शकील एस. शेख यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, बालाजी नगर येथे राहणाऱ्या प्रशांत पांडुरंग टेकडे या इसमाकडून मोठ्या प्रमाणावर बंदी असलेल्या पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे २८ जून रोजी सायंकाळी १२:१५ वाजता पंचासमवेत पोलिसांनी बालाजी नगर येथील टेकडे यांच्या घरी छापा टाकला. तपासादरम्यान, दोन प्रकारचे पान मसाले आढळून आले –

प्रथम, २४ बॉक्समध्ये भरलेला १०,५०० रुपये किंमतीचा सुगंधी तंबाखूयुक्त पान मसाला,
दुसरा, २८,८०० रुपये किंमतीचा एक बॉक्स ज्यामध्ये १४० पाकिटे असलेला लाल व पिवळ्या रंगाचा सुगंधी तंबाखूयुक्त पान मसाला.
एकूण ३१,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, प्रशांत टेकडे याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी धाराशिव शहर पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक रितु भोसले, अपर पोलीस अधीक्षक शशांक अण्णा मंगळ, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शकील एस. शेख, पोलीस उपनिरीक्षक संदीप अहिवळे, पो.ह. रामराव पचाणे, नानवडे जाधव, महिला पोलीस अंमलदार अश्मिता पाटील, सुधीर मुळकें यांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement