धाराशिव (प्रतिनिधी) –
धाराशिव जिल्ह्यात पुढील काही तासांत विजांचा कडकडाट, वाऱ्याच्या जोरदार सरी आणि अधूनमधून पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांना थेट संदेश (SMS) द्वारे दिलेल्या इशाऱ्यात पुढील ३ ते ४ तासांत हवामानात अचानक बदल होऊ शकतो, असे नमूद करण्यात आले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव व नाशिक या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडू शकतो. तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. विशेषतः वादळी वाऱ्याच्या काळात उंच झाडाखाली उभे न राहणे, विद्युत तारा किंवा खांबांच्या संपर्कात न येणे तसेच शक्यतो घराबाहेर अनावश्यक फिरणे टाळावे, असे सूचनाही देण्यात आल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांनी हवामान खात्याच्या इशाऱ्याला गांभीर्याने घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी
0 Comments