Ad Code

Responsive Advertisement

"48 व्या महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंटमध्ये धाराशिवच्या खेळाडूंची राज्यस्तरीय चमक"

"48 व्या महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंटमध्ये धाराशिवच्या खेळाडूंची राज्यस्तरीय चमक"
कळंब – मुंबई येथे बॉम्बे जिमखाना आयोजित 48 वी महाराष्ट्र स्टेट ओपन स्क्वॉश टुर्नामेंट 2025 नुकतीच पार पडली. या स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील कळंबचा सत्यजितराजे चेतन कात्रे याने 9 वर्षे वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात चौथा क्रमांक पटकावला.

याच स्पर्धेत कळंबच्या वेदांत शिंदे याने 11 वर्ष वयोगटात पाचवा क्रमांक मिळवला, तर विवेक शिंदे याने 15 वर्षे वयोगटात सहाव्या क्रमांकावर आपली छाप उमटवली. तसेच धाराशिव जिल्ह्याची वसुंधरा नांगरे हिने 17 वर्ष वयोगटात विजेतेपद पटकावत राज्यस्तरावर धाराशिवचा लौकिक वाढवला.

या यशामागे मार्गदर्शक राजाभाऊ शिंदे, अभिनव सर, रवी नवले सर आणि करण सर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल खेळाडू, पालक आणि मार्गदर्शक यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement