Ad Code

Responsive Advertisement

वाशी शहरात पाण्याचा कहर; तहसीलदार म्हेत्रे, उपनगराध्यक्ष कवडे यांच्या तत्परतेने दिलासा

वाशी शहरात पाण्याचा कहर; तहसीलदार म्हेत्रे, उपनगराध्यक्ष कवडे यांच्या तत्परतेने दिलासा
वाशी, (शहाबाज काझी)दि. २२ सप्टेंबर –
वाशी शहरातील साठे नगर परिसर पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. परिसरात बांधण्यात आलेला लहान पूल पाण्याच्या अडथळ्याचे प्रमुख कारण ठरत असून, नागरिकांनी हा पूल तोडून नव्याने बांधावा अशी जोरदार मागणी केली.

परिस्थितीची दखल घेत तहसीलदार प्रकाशजी म्हेत्रे व उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने जेसीबीच्या मदतीने चारी खणून जमा झालेले पाणी बाहेर काढले, त्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला.

दरम्यान, नगरसेवक बळवंत कवडे यांनी फेसबुकवर लाईव्ह येऊन साठे नगरमधील परिस्थिती सर्वांसमोर मांडली. त्यांच्या या लाईव्हमुळे नागरिकांच्या अडचणी अधिक ठळकपणे लोकांपर्यंत पोहोचल्या.

या तातडीच्या कारवाईनंतर नागरिकांनी तहसीलदार व स्थानिक प्रशासनाचे कौतुक केले. मात्र, पुन्हा अशी वेळ येऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने कराव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement