Ad Code

Responsive Advertisement

हरवलेल्या, चोरीस गेलेल्या 26 स्मार्टफोन मुळ मालकांस परत



हरवलेले 26 स्मार्टफोन मुळ मालकांस परत.”

पोलीस मुख्यालय : हरवलेल्या, चोरीस गेलेल्या भ्रमणध्वनींचा निरंतर ऑनलाईन शोध उस्मानाबाद पोलीस दलाच्या ‘तांत्रिक विश्लेषन कक्ष’ (TAW) च्या पोउपनि- अनिल किरवाडे, पाकॉ- सुनिल मोरे, अरविंद ढेकणे, विठ्ठल गरड, व्हंदरगुंडे यांचे पथक घेत असते. या शोध मोहिमेतून प्राप्त झालेले भ्रमणध्वनी उस्मानाबाद पोलीसांनी यापुर्वी संबंधीतांना अनेकदा परत केले आहेत.

अशाच प्रकरणांत ऑनलाईन देखरेख करत असता हरवलेले 26 स्मार्टफोन अन्यत्र वापरात असल्याचे तांत्रिक विश्लेषन कक्षास समजताच त्यांनी त्या स्मार्टफोन वापरकर्त्यांची माहिती उपलब्ध करुन दिली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांसह सपोनि- निलंगेकर, पवार, पोउपनि- माने यांच्या पथकाने त्या 26 स्मार्टफोन वापरकर्त्यांशी संपर्क साधून ते स्मार्टफोन जप्त केले. ते स्मार्टफोन आज दि. 27.10.2021 रोजी पोलीस मुख्यालयात मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन व मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनित कांवत यांच्या हस्ते परत करण्यात आले. स्मार्टफोन परत मिळाल्याने या प्रसंगी फोन मालकांनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.

अवैध मद्य विरोधी विषेश मोहिमेच्या पहिल्या दिवशी 28 छापे.”

उस्मानाबाद जिल्हा : जिल्हाभरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना आळा बसावा या हेतूने मा. पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांच्या मार्गदर्शनातून काल व आज अशा दोन्ही दिवशी अवैध मद्य विरोधी मोहिम राबवली जात आहे. यात पहिल्या दिवशी -काल दि. 26.10.2021 रोजी खालील प्रमाणे 28 छापे टाकले. या छाप्यांत पिंपांमध्ये आढळलेला हातभट्टी मद्य निर्मीतीचा सुमारे 5,860 लि. द्रव पदार्थ पोलीसांनी घटनास्थळीच ओतून नष्ट केला. तर दारु जप्त करुन साहित्यासह 282 लि. हातभट्टी दारु, 184 बाटल्या देशी- विदेशी दारु व 24 लि. शिंदी जप्त करुन संबंधीतांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत 28 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात नोंदवले आहेत.

1) मुरुम पोलीसांनी 6 ठिकाणी छापे टाकले असता केसरजवळगा गावातील मठामागे राणेश गायकवाड हे 8 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले. आलूर येथे शंकर राठोड हे 20 लि. हातभट्टी दारु, चंद्रकांत गवंडी हे 14 लि. हातभट्टी दारुसह प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 25 बाटल्या, चनाप्पा क्षिरसागर हे 20 लि. हातभट्टी दारु, तर गंगुबाई धुमाळ 22 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या आढळल्या. तसेच मुरुम येथील मिर्झा भुखंडावर हुसणय्या तेलंग हे 15 लि. शिंदी बाळगलेले आढळले.

2) उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता येडशी गावातील ठाकरे वस्ती रस्त्यालगत बालाजी ओव्हळ हे 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले. बावी गावातील एका पानटपरी शेजारी बाळासाहेब वाघमारे हे प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 18 बाटल्या बाळगलेले आढळले.

3) वाशी पोलीसांनी 3 ठिकाणी छापे टाकले असता लाखनगाव येथे छाया शिंदे या 9 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या, सरमकुंडी येथे कमलाबाई काळे या 9 लि. हातभट्टी दारुसह प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 5 बाटल्या,  सोनैवाडी येथे उत्रेश्वर शिंदे 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.

4) कळंब पोलीसांनी 3 ठिकाणी छापे टाकले असता इटकुर येथे जयश्री शिंदे या 15 लि. हातभट्टी दारु, कळंब येथील पर्यायी मार्गाजवळ संगीता पवार या हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ-पाणी मिश्रणाचा 300 लि. आंबवलेल्या द्रवपदार्थासह 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या आढळल्या. मोहा येथील खामसवाडी रस्त्यालगत अजित मडके हे प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगलेले आढळले.

5) आनंदनगर पोलीसांना पारधी पिढी, सांजा येथे शिवाजी पवार हे 35 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.

6) भूम पोलीसांना इंदीरानगर येथे हिराबाई पवार या हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ-पाणी मिश्रणाचा 160 लि. आंबवलेला द्रवपदार्थ पिंपात बाळगलेल्या आढळल्या.

7) बेंबळी पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता माकणी येथे संग्राम पवार तर कनगरा येथे शेषेराव राठोड हे प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 35 व 30 बाटल्या बाळगलेले आढळले.

8) उस्मानाबाद (श.) पोलीसांना जुने बस आगारामागील नाल्यात दत्ता चव्हाण हे हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ-पाणी मिश्रणाचा 1,400 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या पिंपात बाळगलेले आढळले.

9) उमरगा पोलीसांनी 4 ठिकाणी छापे टाकले असता मसनजोगी वस्ती परिसरात अलिम नदाफ हे 9 लि. शिंदी हे मादक द्रव्य, तुरोरी येथे लक्ष्मण लिंबोळे हे 30 लि. हातभट्टी दारु, कदेर येथे अमोल कुनाळे हे 40 लि. हातभट्टी दारु, तर मुळज येथे संतोष जेवळे हे प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगलेले आढळले.

10) अंबी पोलीसांना वाटेफळ बस थांब्याजवळ लक्ष्मण गिरवले हे पोलीस छाप्याची चाहूल लागताच प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 36 बाटल्या घटनास्थळावर सोडून पळाले.

11) तुळजापूर पोलीसांनी 2 ठिकाणी छापे टाकले असता अपसिंगा येथे कर्ण डोलारे हे 15 लि. हातभट्टी दारु, काक्रंबा येथे बाळु मस्के हे 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.

12) ढोकी पोलीसांनी जागजी येथील हातभट्टी दारु निर्मीतीच्या अड्ड्यावर छापा टाकला असता बालाजी आडे, सविता आडे, अंकुश चव्हाण, माणिक व विनायक राठोड हे हातभट्टी दारु निर्मीती करीता गुळ-पाणी मिश्रणाचा 4,000 लि. आंबवलेला द्रवपदार्थ प्लास्टीकच्या पिंपांत बाळगलेले आढळले.

13) लोहारा पोलीसांना कास्ती बुद्रुक येथे गौतम भंडारे हे प्रत्येकी 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 15 बाटल्या बाळगलेले आढळले. 
 


 

 “मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई.”

उस्मानाबाद पोलीस दलातर्फे दि. 26 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी महत्वाच्या रस्त्यांवर मोटार वाहन कायदा- नियम भंग करणाऱ्यांवर एकुण 358 कारवाया करुन 85,900 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

 

जुगार विरोधी कारवाई.”

उस्मानाबाद जिल्हा : उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांनी दि. 26.10.2021 रोजी अंबेजवळगा तांडा येथील समाज मंदीरात छापा टाकला असता ग्रामस्थ- अंकुश राठोड, दिलीप राठोड, बालाजी राठोड हे तीघे तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 1,330 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.

परंडा पोलीसांनी दहिटणा गावातील अंगणवाडी समोर छापा टाकला असता ग्रामस्थ- नागनाथ काकडे, पुरुशोत्तम जगताप, विक्रम काकडे, हरिदास पवार, अर्जुन भांड, रामेश्वर काकडे हे सर्वजण तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 1,200 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.

            यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 

चोरी.”

शिराढोन पोलीस ठाणे : धनेगाव येथील विश्वमित्र माणिकराव पाटील यांच्या आवाड शिरपुरा येथील गट क्र. 296 मधील शेतातील दोन बैल दि. 25- 26.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

ढोकी पोलीस ठाणे : खेड, ता. उस्मानाबाद येथील सतिश दत्तु शिंदे यांनी त्यांचा महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एल 8462 हा आपल्या घरासमोर लावला असता तो दि. 20- 21.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सतिश शिंदे यांनी दि. 26 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

अपघात.”

उमरगा पोलीस ठाणे : कसगीवाडी, ता. उमरगा येथील बलभिम माने यांच्या सोबत भास्कर माने हे दि. 03.09.2021 रोजी 19.30 वा. सु. चौरस्ता उमरगा येथील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 7854 ने प्रवास करत होते. यावेळी बलभिम माने यांनी नमूद मो.सा. निष्काळजीपने चालवल्याने घसरल्याने ते स्वत: जखमी होउन भास्कर माने हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या भास्कर माने यांच्या पत्नी- बबीता माने यांनी दि. 26.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

मारहान.”

ढोकी पोलीस ठाणे : किणी, ता. उस्मानाबाद येथील बालाजी घोडके यांनी दि. 21.10.2021 रोजी 14.00 वा. सु. किणी शिवारातील शेतात चरण्यास सोडलेल्या म्हशी शेजारील- चंद्रसेन घोडके यांच्या शेतात गेल्या. या कारणावरून चंद्रसेन यांसह त्यांचा मुलगा- लक्ष्मण यांनी बालाजी यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड डोक्यात मारुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बालाली घोडके यांनी दि. 26.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर पोलीस ठाणे : आपसिंगा, ता. तुळजापूर येथील रावसाहेब क्षिरसागर यांनी त्यांच्याकडे कामास येत नसल्याच्या कारणावरुन ग्रामस्थ- दत्ता कांबळे यांना दि. 26.10.2021 रोजी 13.30 वा. सु. गावातील जि.प. शाळेसमोर शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळईने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दत्ता कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                           

                                                                                                   जनसंपर्क विभाग उस्मानाबाद पोलीस.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement