Ad Code

Responsive Advertisement

प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे उस्मानाबाद येथे बेमुदत उपोषण आंदोलन

प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण आंदोलन

उस्मानाबाद:- प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालयासमोर दिनांक २७ ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे
   राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मान्य केलेल्या व इतर आर्थिक प्रश्नांची सोडवणूक राज्य परिवहन प्रशासनाकडून होत नसल्याने कामगारांची प्रचंड आर्थिक अडचण निर्माण झाली आहे केलेल्या कामाचे वेतन वेळेवर न मिळणे व आर्थिक नैराश्यापोटी २५ कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत
  ३० जून २०१८ राज्य परिवहन प्रशासनाकडून काढलेल्या परिपत्रकानुसार वार्षिक वेतनवाढीचा ३ टक्के व घरभाडे भत्याचा दर ८,१६,२४ टक्के लागू केलेला नाही कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणारा महागाई भत्त्याचा दर राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना मान्य केलेले असतानाही शासन निर्णयानुसार महागाई भत्ता देय झालेला नाही तरी शासन निर्णयाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता थकबाकीसह कर्मचाऱ्यांना देण्यात यावा शासकीय नियमाप्रमाणे सणासाठी १२५०० रुपये अग्रीम व १५००० रुपये दिवाळी भेट दिवाळीपूर्वी देण्यात यावी
   कोरोना कालावधीमध्ये राज्य परिवहन कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून प्रवासी सेवा वाहतूक दिवस-रात्र सुरू ठेवली करोनामुळे महामंडळातील ३०० पेक्षा जास्त कर्मचारी मयत झाले तसेच राज्यावर ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी प्रथम प्राधान्याने धाव घेतलेली आहे राज्य शासनाच्या प्रत्येक विधायक कार्यामध्ये व राज्याच्या सर्व क्षेत्राच्या विकासामध्ये महामंडळाचा असलेला सहभाग याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाला राज्याची रक्तवाहिनी मानली जाते त्यामुळे इतर काही राज्यांमध्ये परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण केले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करून राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करावे या मागण्यासाठी विभागीय कार्यालयासमोर महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे
 दिलेल्या निवेदनावर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष मधुकर अंगभूले विभागीय सचिव शरद राऊत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष अशोक म्हेत्रे विभागीय सचिव दादासाहेब घोडके महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकचे अध्यक्ष रमेश बनसोडे विभागीय सचिव शशिकांत सावंत कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा रेश्मा हुंबे विभागीय सचिव विजयकुमार कांबळे महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे अध्यक्ष रामराजे भिसे विभागीय सचिव समाधान गाटे यांच्या सह्या आहेत

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement