Ad Code

Responsive Advertisement

Omicron : महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ, राज्यात आणखी सात जणांना ओमायक्रॉनची लागण

मुंबई -  महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आहे. शनिवारी डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला होता. यामध्ये आता आणखी सात जणांची भर पडली आहे. पिपंरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक ओमायक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या आता आठ झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यासोबतच पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी फिनलँड देशात गेला होता.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement