उस्मानाबाद: जिल्ह्यातील उरूस उत्सवावर कोरोनाचे सावट कोरोना नियमांचे पालन करून फक्त ५० लोकांच्याच उपस्थित धार्मिक विधीसह उत्सव साजरा होणार असल्याची माहिती जिल्हा अधिकारी यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील एक मोठा उत्सव म्हणून हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा उरूस उत्साही वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो.या उत्सवात पंचक्रोशीतील सर्वच जातीधर्माचे लोक उत्साहाने सहभागी होतात.यावर्षी हा उत्सव १४ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. या शासकीय उत्सवाची सुरूवात उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांच्या डोक्यावर संधल देऊन वाजतगाजत मिरवणूक काढली जाते.यात जिल्ह्याचे खासदार,सर्व आमदार,लोकप्रतिनिधी यांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फक्त धार्मिक विधीच पूर्ण करून उरूसात साजरा होत. असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला या उरूसात सहभागी होण्याची संधी मिळत नव्हती. यावर्षी थोडी कोरोनाची परिस्थिती नियंत्रित असल्याने उरूसात सर्वसामान्य जनतेला सहभागी होता येईल व चांगली रोषणाई करुन साजरा करता येईल आशी उरूस कमिटी, वक्फ बोर्ड व सर्वसामान्य जनतेला आशा होती.
म्हणून उरूस कमिटी वक्फ बोर्ड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे हजरत शमशोद्दीन गाजी रहे यांचा उरूस साजरा करण्याची परवानगी मागितली होती. जिल्हाधिकारी यांनी उरूस कमिटी व वक्फ बोर्ड यांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पाळून फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पूर्ण करण्याची परवानगी दिली आहे
0 Comments