उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी संपली राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस चा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासमोर वक्तव्य
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली असल्याची मुक्ताफळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस पाटील यांनी उधळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात जमलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह देखील प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याने कुजबूज सुरू झाली. दरम्यान यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कधी व कुठल्या काळी पक्ष संपत नसतो. भाजपने दोन जागांच्या बळावर सुरुवात करून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी संपली अशा पोकळ गप्पा कोणीही मारू नये असे खडावत सुरेश पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस संपणार नाही असे सुनावत आयोजित मेळाव्यात झापले. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त मीच एकमेव एकनिष्ठ पदाधिकारी असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटलांचे सर्वासमोर पितळ उघडे पडले.
0 Comments