प्रशांत (बापू)साळुंके यांच्या पाठपुराव्यामुळे मंदिर-मस्जिद परीसर झाला प्रकाशमय
उस्मानाबाद दि.८ (प्रतिनिधी) - शहरातील शाहूनगर स्वामी समर्थ महाराज मंदिर व मिल्ली कॉलनी येथील सफा मस्जिद या परिसरात निःस्वार्थ राजकारण करीत शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी सतत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे ४० फूट उंचीचे ६ एलईडी बसवून या धार्मिक परिसरातील अंधार कायमचा दूर केला आहे.
उस्मानाबाद शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या स्वामी समर्थ महाराज मंदिर व मिल्ली कॉलनीतील सफा मशीद या भागात लाईटची व्यवस्था नसल्यामुळे हा भाग सतत अंधारात होता. त्यामुळे या ठिकाणी लाईटची सोय व्हावी यासाठी शिवसेनेचे शहर उपप्रमुख प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी नगर परिषद प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. त्यासाठी निवेदने आंदोलने व न्यायालयाच्या मार्गाचा देखील अवलंब केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून या दोन्ही धार्मिक स्थळ परिसरात असलेला अंधार कायमचा दूर केल्यामुळे हा संपूर्ण परिसर स्वच्छ व लख्ख प्रकाशाने उजळून निघाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना असलेली प्रकाशाची प्रतीक्षा संपली असून ते आनंदून गेले आहेत. हे काम निस्वार्थीपणे करीत असताना देखील काही राजकिय पक्ष स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी महाराट्रात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा खटाटोप व आटापिटा करतात. मात्र हा प्रशांत नावाचा अवलिया कोणतेही पद नसताना हिंदू-मुस्लिम असा भेदभाव न करता सामाजिक काम निडरपणे करीत आहे हे विशेष. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्यांच्या या कामामुळे समाधानी असून अशीच विकासात्मक कामे करण्यासाठी आशिर्वाद देत आहेत.
स्वामी समर्थ मंदिर उद्घाटन अतिष पाटिल सुनिल फंड गोपाळ आकोस्कर पडवळ सर यांच्यासह पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते तर सफा मशिदचे इमाम व काझी व नागरीक उपस्थित होते
0 Comments