Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद शहरातील शम्स पुरा भागातील महिलांचे न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन

उस्मानाबाद शहरातील शम्स पुरा भागातील महिलांचे न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन

उस्मानाबाद : शहरातील शम्स पुरा येथील महिलांनी उस्मानाबाद नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मूलभूत सुविधा मिळावे यासाठी निवेदन दिले आहे . 

शहरातील हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे दर्ग्याच्या बाजच्या परिसरातील शम्स पुरा भागातील 25 वर्षापेक्षा जास्त वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना कसल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नगरपालिकेकडून मिळत नाहीत तात्काळ मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना या भागातील महिलांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे तात्काळ सुविधा मिळाव्या अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील महिलांनी दिला आहे. रस्ते ते नाल्या , स्टेट लाईट या मूलभूत सुविधा मिळावा यासाठी महिलांच्या वतीने निवेदन देण्यात आले सकाळी पाहुणे बारा वाजताच्या सुमारास नगरपालिकेमध्ये आलेल्या महिलांना निवेदन घेण्यासाठी कोणत्याही अधिकारी उपलब्ध नसल्याने महिलांनी काही काळ थांबून नंतर आवक जावक या ठिकाणी मागण्याचा अर्ज दाखल केला आहे. 

 या निवेदनावर फर्जना शेख , शेहनाज शेख,  रफीया शेख , सुहाना शेख , सुलताना मुजावर , झोरा कुरेशी , नजमा सय्यद , रशिदा तांबोळी,  रेश्मा तांबोळी , शम्शाद तांबोळी यांच्यासह या भागातील अनेक महिलांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement