Ad Code

Responsive Advertisement

“अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव पोलीसांची कारवाई.”

“अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव पोलीसांची कारवाई.”
दि.09.11.2023 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरगा यांचे पथकास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन एक स्कॉर्पिओ गाडी ही चिंचकोट ते उजळम रस्ता उमरगा येथुन जात आहे. त्यावर पथकाने लागलीच तेथे जावून जाणारे येणारे वाहने चेक करत असताना समोरुन येणारे वाहन क्र एम.एच. 14 डी एफ 3040 स्कॉर्पिओ हे वाहन पेट्रोलिंग दरम्यान चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. यातील चालक आरोपी नामे-1) आजिम आयुब उमाटे, वय 34 वर्षे, रा. कपिलनगर खाडगाव रोड, लातुर ता.जि. लातुर, 2)सज्जाद ईस्माईल सय्यद, वय 36 वर्षे, रा. औसा मोड, हाश्मीनगर औसा ता. औसा जि. लातुर यांचे ताब्यात सदर वाहनात 1) रजनीगंधा सुगंधीत मसाला 100 ग्रॅम 180 टिन असलेले 14 बॉक्स, 2) ) रजनीगंधा सुगंधीत मसाला 1 कि ग्रॅ, 3)बाबा नवरत्न मसाला 100 ग्रॅम 10 टिन, 4) बाबा नवरत्न पान मसाला 1 कि. ग्रॅ, 5) आर एम डी पान मसाला 20 बॉक्स, 6) एम सेनटेंड टोबॅको 20 बॉक्स, 7) बाबा 120 प्रिमियम चुविंग टोबॅको200 ग्रॅम 14 टिन, बाबा 54 प्श्रिमीयम चुविंग टोबॅको 200 ग्रॅम चे 14 टिन , 9) बाबा ब्लॅक डिलक्स चुविंग 1 किं ग्रॅ 48 टिन, 10) बाबा ब्लॅक टोबॅको 50 ग्रूम 350 ग्रॅम बॉटल 300  असा एकुण 11,99,180 किंमतीचा माला सह स्कॉर्पिओ वाहन अंदाजे 8,00,000 ₹ किंमतीचा असा एकुण 19,99,180 ₹ किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल व दोन आरोपी नामे- 1) आजिम आयुब उमाटे, वय 34 वर्षे, रा. कपिलनगर खाडगाव रोड, लातुर ता.जि. लातुर, 2)सज्जाद ईस्माईल सय्यद, वय 36 वर्षे, रा. औसा मोड, हाश्मीनगर औसा ता. औसा जि. लातुर याचे विरुध्द पोलीस ठाणे उमरगा येथे गुरनं 603/2023  भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, 188 सह अन्न व सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम  26 (2) (आय), 26(2) (चार), 27 (3), (ई), 30(2अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उप  निरीक्षक पुजरवाड करत आहे.
          सदर कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बरकते साहेब, उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी  श्री. निरीक्षक पारेकर, उपविभागीय कार्यालय उमरगा यांचे पथकाने केली. 

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement