Ad Code

Responsive Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चित्रकला स्पर्धेत मुस्लिम विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कला प्रस्तुती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त चित्रकला स्पर्धेत मुस्लिम विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कला प्रस्तुती
धाराशिव(प्रतिनिधी ): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक कार्यालय धाराशिव यांच्या वतीने शम्सुल उलुम उर्दू हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि विविध सुंदर चित्रे रेखाटली.

विशेषतः, या स्पर्धेत पठाण हुदा रियाज आणि पठाण रीमा मोईन या विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यांच्या सहाय्याने अप्रतिम शिवचित्र साकारले. त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींना परीक्षकांकडून विशेष प्रशंसा मिळाली.

या विद्यार्थ्यांना शाळेतील कला शिक्षक श्री. शेख आसेफ जाकेर यांनी मार्गदर्शन केले. तसेच, या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. सादत अली सर आणि पर्यवेक्षिका श्रीमती रेश्मा परवीन मॅडम उपस्थित होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहेत. विविध समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचे चित्रण आपल्या कलेतून साकारल्याने सामाजिक ऐक्य आणि ऐतिहासिक जाणीव वाढीस लागण्यास मदत होईल, असे उपस्थित नागरिकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement