Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव शहरातील मोबाईल टॉवरच्या हानिकारक रेडिएशनवरून नागरिकांचा संताप; प्रशासनाकडे तक्रार

मोबाईल टॉवरच्या हानिकारक रेडिएशनवरून नागरिकांचा संताप
धाराशिव शहरातील विविध भागांमध्ये स्थापन केलेल्या हाय रेडिएशन मोबाईल टॉवरच्या विरोधात नागरिकांनी आवाज उठवला आहे. या संदर्भात धाराशिव शहरातील विशेष करून खाजा नगर येथील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
या पत्रकात त्यांनी शहरातील टॉवरमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची सखोल माहिती दिली आहे. अनेक ठिकाणी नियमानुसार परवानगी न घेता हे टॉवर उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वृद्ध, लहान मुले आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे त्वरित योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेषतः शहरातील खाजा नगर भागांमध्ये इंडिया मेडिकल च्या वरी उभारलेले टॉवर त्वरित हटवावेत, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हा विषय आरोग्यासंबंधी गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement