Ad Code

Responsive Advertisement

सुलतान ए हिंद प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी संपन्न – सामाजिक एकतेचा संदेश

सुलतान ए हिंद प्रतिष्ठानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी संपन्न – सामाजिक एकतेचा संदेश
धाराशिव : पवित्र रमजान महिन्यानिमित्त सुलतान ए हिंद प्रतिष्ठान, उस्मानाबाद यांच्या वतीने एम. के. फंक्शन हॉल, खाजानगर, उस्मानाबाद येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सामाजिक एकतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाला सुलतान ए हिंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष खलील सय्यद सर आणि सचिव इम्तियाज बागवान यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर:

काँग्रेस पक्षाचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, माजी उपनगराध्यक्ष आबा इंगळे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे, विष्णू इंगळे, सोमनाथ चपणे, जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र दादा पाटील, मौलाना खारी कलीम शेख, शिक्षक नेते बशीर तांबोळी, माजी नगरसेवक मुनीर कुरेशी, पत्रकार प्रभाकर लोंढे,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष खंडू राऊत डॉ दिग्गज दाबके, फिरोज पल्ला, लक्ष्मण माने, अनंत जगताप, अशोक बनसोडे सर, इस्माईल शेख सर, इस्माईल काझी, इर्शाद कुरेशी आणि शहानवाज सय्यदजादे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बागवान जमातचे अध्यक्ष इम्तियाज बागवान, तौफिक काझी, अबरार कुरेशी, कफिल सय्यद, निसार बागवान, आरीफ मुलानी, नूर बागवान आणि रफिक बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात शांतता, सौहार्द आणि एकतेचा संदेश देण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement