Ad Code

Responsive Advertisement

शेतकऱ्यांनो, PM Kisan लिंक उघडताना सावधगिरी बाळगा! नाही तर बँक खाता होईल रिकामा

शेतकऱ्यांनो, PM Kisan लिंक उघडताना सावधगिरी बाळगा!
धाराशिव (शेख जाफरोद्दीन रब्बानी ) – PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan list, APK किंवा PM Kisan APK या संदेशांमधील लिंक उघडल्यामुळे त्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत असल्याच्या घटना घडत आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. तसेच, अशा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक फसवणुकीस सामोरे गेल्यास, जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी.

जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी यांना देखील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत सरकारी संकेतस्थळांवरूनच माहिती घ्यावी व फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे.



Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement