साहेबांच्या तब्येतीची आस्थेवाईक पणे केली चौकशी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थिती वर चर्चा...
जिल्ह्यात शिवसेना पक्षाला उभारी व कार्यकर्त्यांना बळ देण्याची धमक आमदार तानाजीराव सावंत यांच्या मध्येच असल्याचे मांडले परखड मत.
महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी राव सावंत साहेब आजारी आहेत अश्या बातम्या 2 दिवसापासुन प्रसार माध्यामातून प्रसिद्ध होत आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते अॅड योगेश केदार यांनी आमदार तानाजी राव सावंत यांची भेट घेतली व या संदर्भात फेसबुक पोस्ट करून माहिती दिली उपचार सुरू असताना सुधा साहेबांनी आमच्या बरोबर तास भर गप्पा मारल्या आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये पुढे लिहिताना योगेश केदार यांनी आमदार तानाजी सावंत यांच्या विषयी आपले भावनिक मत मांडले
आमचे काही मुद्द्यांवरून मतभेद झालेही असतील. जाहीर ठिकाणी ते व्यक्तही केले. पण आमदार सावंत सर यांच्या सारखा मनाचा मोठेपणा असलेला नेता दुर्मिळ आहे. आजही धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेला उभारी देण्याची धमक केवळ आमदार तानाजी सावंत साहेबांच्या मध्येच आहे. हेही मान्य करावे लागेल. जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर देखील आम्ही चर्चा केल्या. त्यांच्या सारख्या अनुभवी आणि कार्यकर्त्यांना आधार देऊ शकणाऱ्या नेत्यांना विश्वासात घेऊन पुढची रणनीती रचणे आवश्यक आहे. अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यश कठीण दिसते असे परखड मत योगेश केदार यांनी मांडले गट तट सोडून सर्वांनी एकत्र प्रयत्न केल्यास आजही शिवसेना पक्ष अन धनुष्य बाण चिन्ह धाराशिव जिल्ह्यात मजबूत दिसेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला तसेच
तोंडावर गोड बोलुन मिच शहाणा म्हणणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्या भरपूर वाढल्या आहेत. त्यांची साफसफाई जितकी लवकर होईल तितक्या लवकर पक्ष वाढेल अशी कोपरखडी योगेश केदार यांनी आजच्या प्राप्त परिस्थितीवर मांडली व आमदारांनी सावंत यांनी लवकर बरे होवून जनतेच्या सेवेत रुजू व्हावे असा आशावाद व्यक्त केला...
0 Comments