Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव येथे पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला; मागितली 4 लाखांची लाच

पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध लाच मागणीची यशस्वी पडताळणी

४ लाखांच्या मागणीचा पर्दाफाश; आरोपीच्या ताब्यातून रोकड व मोबाईल जप्त

प्रतिनिधी | धाराशिव
धाराशिव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणाकडून गुन्ह्याच्या तपासात त्याच्या भावाचे नाव कमी करण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागितल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) धाराशिव युनिटने सखोल पडताळणी करून सदर पोलिस कर्मचाऱ्याच्या लाच मागणीचा पर्दाफाश केला आहे.

तक्रारदार तरुण वय २४, व्यवसाय शिक्षण असलेला असून त्याने आपल्या वडील व भावाविरुद्ध दाखल गुन्ह्यात भावाचे नाव कमी करण्यासाठी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने ५ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ४ लाख रुपयांवर आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आरोपीचे नाव मोबीन नवाज शेख (वय ४१), पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे कार्यरत असून, तो सध्या अमृतनगर, पोल्ट्री समोर, धाराशिव येथे वास्तव्यास आहे.

दिनांक १७ जून २०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपीने तक्रारदाराकडे लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, सापळा कारवाईदरम्यान आरोपीने प्रत्यक्ष लाच रक्कम स्वीकारलेली नाही.

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तू:

बुलेट मोटरसायकलची चावी

पांढऱ्या रंगाचा हातरुमाल

एकूण ८,६७० रुपयांची रोख रक्कम (५०० × १७, १०० × १, ५० × १, २० × १)

काळ्या रंगाचा Oppo कंपनीचा मोबाईल


सदर वस्तू आरोपीच्या अंगझडतीत मिळून आल्या असून त्याचा पंचनामा करून त्या जप्त करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आरोपीच्या घरझडतीसाठी पथक तातडीने रवाना करण्यात आले असून ती प्रक्रिया सुरू आहे.

पुढील कायदेशीर कारवाई सुरू

सदर प्रकाराबाबत धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला अटक करून सखोल तपास करण्यात येणार आहे. त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येणार आहे.

कारवाईसाठी जबाबदार अधिकारी:

तपास अधिकारी: श्री. बाळासाहेब नरवटे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., धाराशिव

सहाय्यक तपास अधिकारी: श्री. विजय वगरे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., धाराशिव

कारवाई पथक सदस्य: पो.ना. अशिष पाटील, पो.शि. विशाल डोके, पो.शि. सिद्धेश्वर तावसकर

मार्गदर्शन अधिकारी: श्रीमती माधुरी केदार कांगणे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र

पर्यवेक्षण अधिकारी: श्री. योगेश वेळापुरे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि., धाराशिव
(मो. 9049519833 | ई-मेल: dysposmanabad@gmail.com | टोल फ्री क्रमांक: 1064)

सर्वसामान्य नागरिकांसाठी आवाहन:

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने, अथवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ई-मेलद्वारे संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement