धाराशिव – उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यात तेरनानदीला झालेल्या ढगफुटीमुळे मोठा पूर आला. या पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिके वाहून गेली आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली महिला जिल्हा कार्याध्यक्ष सौ. अप्सरा पठाण यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली.
15 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता जवळा दमाला परिसरात त्यांनी भेट दिली. यावेळी जवळा व दुधगाव येथील सरपंच तसेच आमदार राणादादा यांच्याशीही त्यांनी फोनवर चर्चा करून परिस्थितीची माहिती दिली. सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत पाण्याची पातळी कमी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
पठाण यांनी शेतकऱ्यांची थेट भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
0 Comments