वाशी तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी आशेचा किरण – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवा भारतीचा मदतीचा हात
प्रतिनिधी : शहाबाज काझी, वाशी
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने वाशी तालुका हादरून गेला आहे. गावोगाव पाणी शिरल्याने अनेक घरं, शेतजमिनी आणि संसार वाहून गेले आहेत. शेकडो कुटुंबं बेघर झाली असून अन्नधान्य, कपडे, भांडी यांसह सर्व वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या संकटकाळात पूरग्रस्तांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात भीती असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा भारती, धाराशिव यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. वाशी येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात मदत शिबिर सुरू करण्यात आले असून बेघर झालेल्यांसाठी निवास, भोजन, पाणी आणि आवश्यक वस्तूंची सोय करण्यात आली आहे.
स्वयंसेवक रात्रंदिवस झटत असून प्रत्येक कुटुंबाला आधार देत आहेत. “तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत,” हा संदेश पूरग्रस्तांना धीर देत आहे. या शिबिरातून केवळ मदतच नव्हे, तर नव्या उमेदीची ऊर्जा पूरग्रस्तांमध्ये संचारत आहे.
मदतीसाठी संपर्क :
ॲड. प्रदीप देशमुख – ९४२२३४११७५
विक्रांत उंदरे – ९४०३९३२३४०
गजानन भारती – ९८२३५७२२२१
संजय कवडे – ९५२७८८१८०२
सारंग शिंदे – ९०२२७०३४६३
राजेश कवडे – ९०६७७६९३०४
गणेश कुलकर्णी – ९८२२७१७२३०
दरम्यान, वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी शिबिराला भेट देऊन स्वयंसेवकांचे कौतुक केले तसेच आवश्यक मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला.
स्वयंसेवकांनी समाजाला आवाहन केले आहे की, “आज पूरग्रस्तांसाठी एकत्र उभे राहू, उद्या आपणही एकटे राहणार नाही.” राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सेवा भारती पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मदतकार्य राबवत आहेत.
0 Comments