Ad Code

Responsive Advertisement

प्रभाग 18 मध्ये AIMIM चे अझहर मुजावर प्रचार मध्ये आघाडीवर!

प्रभाग 18 मध्ये AIMIM चे अझहर मुजावर प्रचार मध्ये आघाडीवर! 
प्रतिनिधी : शेख जफर रब्बानी, धाराशिव

धाराशिव नगर परिषद निवडणूक 2025 चा प्रचार जोर धरू लागला असून प्रभाग क्रमांक 18 मध्ये निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच तापू लागला आहे. AIMIM पक्षाचे अधिकृत उमेदवार अझहर मुजावर हे प्रचाराच्या शर्यतीत सध्या स्पष्टपणे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

अझहर मुजावर यांनी प्रचाराची सुरुवात प्रभागातील मतदारांशी व्यक्तिगत गाठीभेटी घेऊन केली. घराघरात जाऊन त्यांनी जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आपल्या कामांची माहिती दिली. त्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी संपूर्ण प्रभागात भव्य प्रचार रॅली काढली. या रॅलीला स्थानिक तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला.

प्रचारादरम्यान नागरिकांनी अझहर मुजावर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. प्रभागातील राजकीय विश्लेषकांनुसार, गेल्या काही वर्षांत अझहर मुजावर यांनी केलेल्या सामाजिक कामांची दखल मतदार घेत आहेत. त्यांच्या लोकसंग्रहशील स्वभावामुळे आणि वेळोवेळी केलेल्या मदतकार्यामुळे त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की,
“अझहर मुजावर यांनी गेल्या काळात केलेल्या कामांच्या आणि लोकांपर्यंत पोहोचलेल्या सेवाभावी वृत्तीच्या जोरावर या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.”

प्रभाग 18 मधील वातावरण पाहता आगामी निवडणुकीत स्पर्धा चुरशीची असली तरी AIMIM चे अझहर मुजावर हे या शर्यतीत आघाडीवर असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement