Ad Code

Responsive Advertisement

धाराशिवमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार)ची जोरदार सुरुवात; परविन खलिफा कुरेशी यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धाराशिव नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्ष पदाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या उमेदवार परविन खलील (खलिफा) कुरेशी यांच्या प्रचाराची समता कॉलनीत दमदार सुरुवात
धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार परविन खलील उर्फ खलिफा कुरेशी यांच्या प्रचाराला समता कॉलनी परिसरातून उत्साहपूर्ण सुरुवात झाली. या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला.

या सोबतच प्रभाग क्र. 9 ‘अ’ मधील उमेदवार सौ. रूपालीताई सुनील आंबेकर आणि प्रभाग क्र. 9 ‘ब’ चे उमेदवार शेख नोवेद अब्दुल जब्बार यांच्या प्रचारालाही जोरदार समर्थन मिळाले.
दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी समता कॉलनी, दत्त मंदिर आणि 11 नंबर शाळा परिसर येथे झालेल्या या कार्यक्रमात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले. संपूर्ण परिसरात जल्लोष, एकता आणि निवडणूक उत्सुकता जाणवत होती.

प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रभागातील सुरू असलेली विकासकामे, भावी नियोजन, स्थानिक समस्या, त्यावरील उपाययोजना आणि नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवण्याबाबत ठोस भूमिका मांडली. नागरिकांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) विजयी होईल, असा दृढ विश्वास व्यक्त केला.

या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, प्रदेश सरचिटणीस मसूदभाई शेख, महिला जिल्हाध्यक्षा मनीषाताई पाटील, माजी उपनगराध्यक्ष खलिफा कुरेशी, तालुकाध्यक्ष श्याम अण्णा घोगरे, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धाराशिव शहरातील राजकीय वातावरण तापू लागले असताना, समता कॉलनीत झालेल्या या दमदार सुरुवातीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा आत्मविश्वास आणखी वाढल्याचे चित्र समोर येत आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement