Ad Code

Responsive Advertisement

भाजपचे ज्येष्ठ नेते विलास अण्णा सांजेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश!

भाजपचे ज्येष्ठ नेते विलास अण्णा सांजेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश!

 प्रभाग क्रमांक तीन मधून पुरस्कृत उमेदवारी जाहीर

भाजपचे ज्येष्ठ नेते विलास अण्णा सांजेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये जाहीर प्रवेश केला. प्रभाग क्रमांक 3 मध्ये पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार म्हणून विलास अण्णा यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या वेळी पक्षाचे पूर्वीचे अधिकृत उमेदवार अक्षय साळुंखे यांनी पक्षहिताला प्राधान्य देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि विलास अण्णा सांजेकर यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.

प्रवेशावेळी बोलताना विलास अण्णा म्हणाले, “अनेक वर्षे भाजपमध्ये काम केले, परंतु न्याय मिळाला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार ) मध्ये मला सन्मान आणि योग्य न्याय मिळाला.”

या सोहळ्यात विलास अण्णा सांजेकर यांच्या सोबत अजय सूर्यवंशी, सुजित पवार, सुनील शेळके, उमाकांत आप्पा पवार, प्रशांत पोतदार, पंकज सोनटक्के, सुजित गायकवाड, हर्षल वाघमारे, सिद्धांत सोनवणे, रुकेश पाटील, मंगेश नाईक, वैभव कोंडेकर, शुभम शिंदे, राहुल चौरे, सोमनाथ लोहार, आकाश गोरे, सिद्धार्थ गायकवाड, दिनेश मिटकरी, अमित पोतदार, अखलाख शेख, शंभु शेरकर, दिपक कोकाटे, शरद सोनवणे, सुमित गायकवाड, यश कांबळे, आदित्य गायकवाड, मानव सांजेकर, राज पाटील, स्वप्नील बनसोडे, शोएब खान, मोईज अन्सारी, मिलिंद आदटराव, अमन शेख, अक्षय डुकरे, सागर झोंबाडे, आशिष तडवळकर, श्रीकांत जगदाळे आणि भूषण माने यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार ) मध्ये प्रवेश केला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील,माजी उपनगराध्यक्ष खलिफा कुरेशी,प्रदेश सरचिटणीस मसूदभाई शेख,डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे,नगरसेवक बाबा मुजावर,अण्णा गायकवाड,अमोल सुरवसे,उपाध्यक्ष जयंत देशमुख, ॲड. योगेश सोन्ने पाटील आणि ॲड.अविनाश जाधव,रवि ठेंगील यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवणारा हा ऐतिहासिक निर्णय ठरला असून बदलाची दिशा आता अधिक स्पष्ट दिसू लागली आहे.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement