Ad Code

Responsive Advertisement

“जनतेचा नगरसेवक” सय्यद नादेरुल्लाह हुसैनी प्रभाग १७ मधून २०२५ च्या रिंगणात"

“जनतेचा नगरसेवक” सय्यद नादेरुल्लाह हुसैनी प्रभाग १७ मधून २०२५ च्या रिंगणात"

विकासकामे, शिक्षणसेवा आणि समाजकारणाच्या जोरावर हुसैनी सर पुन्हा जनतेसमोर

प्रतिनिधी : जाफरोद्दीन रब्बानी शेख

धाराशिव
धाराशिव शहरात सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक बांधकामांमधील सक्रिय भूमिकेमुळे ओळख निर्माण केलेले सय्यद नादेरुल्लाह हुसैनी (कालीमुल्लाह) यांनी प्रभाग क्रमांक १७ मधून २०२५ च्या नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे.
दोन वेळा नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेल्या विकासकामांची नोंद आजही जनतेच्या लक्षात आहे.

राजकीय प्रवास — विकासकामी दशकाचा अनुभव

2006 ते 2016 – सलग दोन कार्यकाळ नगरसेवक.
पहिल्यांदा अपक्ष व नंतर काँग्रेस पक्षाकडून विजय.
2006-07: बंधकम सभापती
2006-2016: स्टँडिंग कमिटी सदस्य
2012-2016: जिल्हा न्यूज कमिटी सदस्य
2016 पासून: RKS (रुग्ण कल्याण समिती) सदस्य


नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागातील लाइट व्यवस्था, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सुविधा या सर्व क्षेत्रांत सातत्याने काम केले.
जनतेच्या अडचणी शांतपणे ऐकून तत्काळ समाधान करणारा नेता म्हणून त्यांची वेगळी छाप निर्माण झाली.

शिक्षणातील योगदान — अनेक कुटुंबांना आधार

हुसैनी सरांनी शेकडो विद्यार्थ्यांना फी, पुस्तके, प्रवेशशुल्क आणि इतर शैक्षणिक गरजांसाठी आर्थिक मदत केली.
त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांनी उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरीत स्थिरता मिळवली आहे.
मुस्लिम समाजात शिक्षणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी विशेष उपक्रम राबवले.

समाजासाठी लढवय्या भूमिका

समाजातील विविध प्रश्नांसाठी आंदोलन, निवेदने आणि उपोषणे यामध्ये हुसैनी सरांचा पुढाकार राहिला आहे.
ते न्याय आणि हक्कांसाठी नेहमी ठामपणे उभे राहत असून अनेक तरुणांना समाजकारणात सक्रिय केले आहे.

लोककल्याणाची कामे — स्वतःच्या खर्चातून सेवा
2009: हज़रत ख़्वाजा शमसुद्दीन गाज़ी रह. वेल्फेअर सोसायटीची स्थापना
७०० पेक्षा अधिक सामूहिक विवाह
२००+ विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
मोफत अॅम्ब्युलन्स सेवा (कोरोनापासून आजवर)
२६ मशिदींना आर्थिक मदत
३ एकर जमीन – मुस्लिम समाजासाठी स्मशानभूमीसाठी दान

पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी स्वखर्चातून बोरवेल आणि पाणीपुरवठा
लोककल्याणाच्या या सातत्यपूर्ण कामांमुळे हुसैनी सर समाजात विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
विकासाचे ध्येय — “स्मार्ट, स्वच्छ आणि शिक्षणमुखी धाराशिव”

हुसैनी सरांच्या मते—

 “प्रत्येक नागरिकाला मुलभूत सुविधा, सुरक्षित वातावरण आणि विकासाच्या संधी मिळाल्या पाहिजेत.”

त्यांनी “स्मार्ट वार्ड – स्वच्छ वार्ड – शिक्षणयुक्त वार्ड” ही संकल्पना मांडली असून कामावर आधारित विकासावर त्यांचा भर आहे.

विरोधकांवर टीका

हुसैनी सरांनी प्रभागातील काही विरोधकांवर निशाणा साधत म्हटले—
“दहा वर्षे गोडगोड आश्वासनं देण्यात गेली; प्रत्यक्ष काम मात्र काहीच झालं नाही.
जनता आता काम पाहते, घोषणांवर नाही.”
या वक्तव्यामुळे प्रभाग १७ मध्ये राजकीय चर्चेला वेग आला आहे.


मतदारांना आवाहन

“धर्म–जात बाजूला ठेवून काम करणाऱ्याला निवडा.
तुमचा विश्वास माझ्यासाठी ताकद असून तुमच्या विकासासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे.”

उमेदवारीवर लोकांचा सकारात्मक प्रतिसाद

प्रभाग १७ मध्ये हुसैनी सरांची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक नागरिकांचे मत —
“काम, समाजकारण आणि सेवा — याच आधारावर यावेळीही हुसैनी सरांना संधी मिळणार!”

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement