Ad Code

Responsive Advertisement

उत्तर प्रदेश सरकारने द्वेषभावनेतून मौलाना सिद्दिकी यांना केलेल्या अटकेचा उस्मानाबाद इमाम कौन्सिल कडून निषेध

उत्तर प्रदेश सरकारने द्वेषभावनेतून मौलाना सिद्दिकी यांना केलेल्या अटकेचा उस्मानाबाद इमाम कौन्सिल कडून निषेध

उस्मानाबाद - उत्तर प्रदेश सरकारने द्वेष भावनेतून मौलाना कलीम सिद्दिकी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद शहरातील इमाम कौन्सीलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दिनांक १ ऑक्टोंबर रोजी धरणे आंदोलन करून निषेध नोंदवत निदर्शने करण्यात आली
     मागील काही वर्षापासून उत्तर प्रदेशमधील योगी सरकार कडून तेथील मुस्लिम समाजाला राजकीय स्वार्थासाठी लक्ष करून विविध प्रकारचा नाहक त्रास देण्याचे काम चालू असून हे मानवी हक्कांचे पायमल्ली करण्याचा प्रकार उत्तर प्रदेश सरकारकडून चालू आहे मौलाना कलीम सिद्दिकी व त्यांचे दोन साथीदार मौलाना उमर गौतम व मुफ्ती जहांगीर कासमी यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे मौलाना सिद्दिकी यांचे सामाजिक क्षेत्रातील उत्तर भारतातील काम मोलाचे आहे त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी शैक्षणिक संस्था व मदरसे स्थापन करून सेवा करण्याचे काम केले आहे त्यांनी राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा अबाधित ठेवण्यासाठी आतापर्यंत केलेले कार्य मोठे असून त्यांचे समाजाप्रती असलेले कार्य उत्तर प्रदेश मधील योगी सरकारला रुचत नाही त्यामुळे त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन बेकायदेशीर परकीय चलन व जबरदस्तीने धर्मांतर आधी खोटे आरोप लावून त्यांना अटक केलेली आहे हे भारतीय घटने नुसार नसून घटनेतील कलम २५ चे अधिकाराचे उल्लंघन करणारे आहे उत्तर प्रदेश व इतर राज्यात अल्पसंख्यांकाना लक्ष करून मतांचे राजकारण करणे व राजकीय फायद्यासाठी देशातील २५ कोटी अल्पसंख्यांक लोकांना वेठीस धरता येणार नाही

    या प्रकरणांमध्ये राष्ट्रपती यांनी जातीने लक्ष घालून उत्तर प्रदेशात अल्पसंख्यांक समाजावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करावे तरच भारतामध्ये जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता नांदेल व देशात शांततेचे वातावरण निर्माण होऊन प्रगती होईल आपणास विनंती की उत्तर प्रदेश सरकारने मौलाना कलीम सिद्दिकी व त्यांचे सहकारी यांच्यावरील सर्व खोटे आरोप माघारी घेऊन त्यांची मुक्तता करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला आदेश द्यावे अशा प्रकारचे निवेदन राष्ट्रपती यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात  आहे  
    या निवेदनावर  मौलाना ताहेर, जमियात ए उलेमाचे मराठवाडा सरचिटणीस मसूद शेख  हाफिज शेख आलिम, मकसुद खारी, हफिज अल्ताफ कुरेशी मुफ्ती उमर फारूक खमर कुरेशी, मुबारक सिद्दिकी , नगरसेवक आयाज शेख ,इस्माईल शेख, अफरोज पिरजादे , कादर खान ,बिलाल तांबोळी यांच्या सह्या आहेत शहरातील इमाम कौन्सिलचे पदाधिकारी व मुस्लीम बांधव या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते

Osmanabad Imam Council protests Uttar Pradesh government's hateful arrest of Maulana Siddiqui

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement