Ad Code

Responsive Advertisement

जिल्ह्याचा चेहरा मोहरा-बदलणारपंधरा महिन्यात पाच हजार कोटींचा निधीयुथ फोरमच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भव्य नागरी सत्कार

जिल्ह्याचा चेहरा मोहरा-बदलणार
पंधरा महिन्यात पाच हजार कोटींचा निधी
युथ फोरमच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा भव्य नागरी सत्कार


धाराशिव जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजनांना आता गती मिळाली आहे. दहा हजार रोजगार निर्मितीचा टेक्निकल टेक्स्टाईल पार्कला मंजुरी मिळाली आहे. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीजींच्या चरणी रेल्वेगाडी धावणार आहे. जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेने धाराशिव जिल्ह्याचा प्रवास वेगाने प्रवास सुरु आहे आणि जिल्ह्याच्या शेतशिवरात यंदा कृष्णेचे पाणी खळाळणार आहे. त्यासाठी दमदार कामगिरी करीत मागील 15 महिन्यात पाच हजार कोटींहून अधिक निधी मिळविल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा रविवारी भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.


जिल्ह्यातील नवउद्योजक असलेल्या तरुणांनी स्थापन केलेल्या युथ फोरम या संघटनेच्या माध्यमातून नागरी सत्कार संयोजन समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून रविवार 1 ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक 12.30 वाजता धाराशिव शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तुळजाभवानी देवीचे महंत तुकोजी बुवा, योगी महंत मावजीनाथ बुवा, सांगोल्याचे आमदार ऍड शहाजी बापू पाटील, जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे साहेब, श्रीमती कमलताई नलावडे, प्रा.डॉ. सतीश कदम, ऍड अविनाशराव देशमुख यांच्यासह शहर व जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आमदार पाटील यांचा युथ फोरमच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता व जागा मंजूर करून दिल्याबद्दल, कौडगांव एम. आय.डी.सी. सौर ऊर्जा प्रकल्प, सुरत-चैन्नई सहपदरी महामार्ग,  शक्तीपीठ महामार्ग या महत्वपूर्ण प्रकल्पांना मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चिकाटीच्या बळावर मागील 15 महिन्यांच्या कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध महत्वपूर्ण प्रकल्प आणि विकासकांसाठी सुमारे 5000 कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याबद्दल जिल्हावासीयांच्या वतीने आमदार पाटील यांचे मनःपूर्वक धन्यवाद मानण्यासाठी या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युथ फोरमच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement