मध्य रेल्वे पुणे आणि हरंगुळ दरम्यान दररोज विशेष ट्रेन चालवणार आहे
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पुणे आणि हरंगुळ दरम्यान विशेष ट्रेन खाली दिलेल्या तपशिलानुसार चालवण्याचा निर्णय घेतला आहे:
01487 पुणे- हरंगुळ दि. १०.१०.२०१३ ते ३१.१२.२०२३ पर्यंत पुण्याहून ०६.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.५० वाजता हरंगुळला पोहोचेल.
01488 हरंगुळ- पुणे दि. १०.१०.२०१३ ते ३१.१२.२०२३ पर्यंत हरंगुळ येथून १५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २१.०० वाजता पुण्याला पोहोचेल.
*थांबे*: हडपसर, उरुळी, केडगाव, दौंड, जेऊर, केम, कुर्डूवाडी, बार्सी टाऊन आणि उस्मानाबाद.
*संरचना:* एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, ३ सामान्य द्वितीय श्रेणीसह लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.
*आरक्षण*: विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक 01487/01488 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग दि. ८.१०.२०२३ रोजी सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
---------
दिनांक: ६ ऑक्टोबर, २०१३
प्रप क्रमांक 2023/10/18
सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मुख्यालय, मध्य रेल्वे, मुंबई यांनी जारी केले आहे.
0 Comments