Ad Code

Responsive Advertisement

"धाराशिव (उस्मानाबाद ) जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. कायद्या खाली दाखल गुन्ह्यातील गांजा नष्ट."


"धाराशिव (उस्मानाबाद ) जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. कायद्या खाली दाखल गुन्ह्यातील गांजा नष्ट."
धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुद्देमाल मा. न्यायालयाने नाश करण्याची परवानगी दिलेल्या गांज्या मुद्देमालाची त्यामध्ये, पोलीस ठाणे तुळजापूर येथील गुरनं १८/२०१३, १७/२०१३, २३९/२०२१, पोलीस ठाणे बॅबळी गुरनं १८/२००८, पोलीस ठाणे नळदुर्ग २३/२०००, ३५/२०१०, २८/२०१२, पोलीस ठाणे भुम ०७/२०१५,१४९/२०२०, पोलीस ठाणे येरमाळा
०१/२०१२, पोलीस ठाणे मुरुम गुरनं१८/२०१६, पोलीस ठाणे धाराशिव शहर गुरनं ११/२००६, २१/२००८, १८/२०१२, ३०२/२०१६ असे ७ पोलीस ठाण्याचा १५ गुन्ह्यातील एकुण ८९१.११९ किलो ग्रॅम असा जप्त केलेला
गांजा हा दि. १६.१२.२०२३ रोजी १६.०० ते १८.०० वा. सु. पोलीस मुख्यालय धाराशिव येथील कवायत मैदान येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गोहर हसन, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्री. सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, उप प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ काप्रलय लातुर श्री. संतोष कुमार चव्हाण, नायब तहसिलदार धाराशिव श्री.घृष्णेश्वर स्वामी, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र धाराशिव श्री. अशोक पवार त्यांचे सहकारी सय्यद अशपाक, अग्नीशामक दल येथील संभाजी साळुंके, भारत जगन्नाथ म्हस्के (मंडळ अधिकारी) सहाय्यक पोलीस
निरीक्षक शैलेश पवार, सपोफौ/५०४ काझी, पोलीस हावलदार औताडे, जावेद काझी, विनोद जानराव पोलीस नाईक- बबन जाधवर, पोलीस अंमलदार योगेश कोळी फोटो ग्राफर शेख, व्हिडीओ ग्राफर पोलीस अमंलदार - विठ्ठल गरड यांचे उपस्थिती सर्व कायदेशीर बाबीची पुर्तात करुन योग्य रित्या जाळून नाश करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement