धाराशिव: धाराशिव शहरातील कचरा डेपोमध्ये रोज कचरा जाळला जात असून, त्याचे धूर आणि दुर्गंधी शहरातील गणेश नगर, उमर मोहल्ला, आणि खाँजा नजर परिसरात पसरत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना रात्रीच्या वेळी धूर व वासामुळे श्वास घेण्यात अडचणी येत आहेत. कचऱ्याच्या जळणाऱ्या धुरामुळे नागरिकांना दम घुटण्याचा त्रासही होत आहे.
हे धुराचे वास दिवसेदिवस वाढत चालले आहे आणि नागरिकांना होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. यावर त्वरित उपाय योजना म्हणून प्रशासनाने कचऱ्याचे डेपो शहराच्या 10 किलोमीटर बाहेर हलवून त्या ठिकाणी कचरा प्रक्रियेची व्यवस्था करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
नागरिकांची स्पष्ट भावना आहे की, या समस्येवर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा, नागरिकांच्या आरोग्याला होणाऱ्या त्रासाबद्दल प्रशासनाला जबाबदार ठरवले जाईल.
नागरिकांनी दिलेल्या मागणीचा विचार करून प्रशासनाने त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.
0 Comments