Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव शहराच्या च्या खिरणी मळा भागात उजनी पाणी लाईन फुटली; हजारो लिटर पाणी वाया

धाराशिव शहराच्या च्या खिरणी मळा भागात उजनी पाणी लाईन फुटली; हजारो लिटर पाणी वाया
धाराशिव : शहरातील खिरणी मळा परिसरात उजनी प्रकल्पाच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना आज, १२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २:४५ च्या सुमारास घडली. ड्रेनेजचे काम सुरू असताना जेसीबीच्या धडकामुळे ही पाईपलाईन फुटली असून त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.
धाराशिव शहरात आधीच आठ ते दहा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा केला जातो. आज पाणीपुरवठ्याचा दिवस असून देखील पाईपलाईन फुटल्यामुळे खिरणी मळा परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

या भागातील रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करावी व पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी केली आहे. पाण्याचा एकेक थेंब मौल्यवान असताना असा अपव्यय टाळण्यासाठी भविष्यात अशा कामांसाठी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक प्रशासनाने यावर त्वरीत कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement