Ad Code

Responsive Advertisement

उद्धव ठाकरे सेनेच्या असंख्य अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश;



उद्धव ठाकरे सेनेच्या असंख्य अल्पसंख्याक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश;

 मल्हार पाटील म्हणाले - मेहनत करा, आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे
धाराशिव : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत धाराशिव शहरातील उद्धव ठाकरे सेनेचे मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात दाखल झाले. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात, तसेच मल्हार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे सेनेचे शहर ग्राहक संरक्षण अध्यक्ष शाहेबाज पठाण, मुजाहेद काझी, अल्लाबक्ष तांबोळी, सोहेल शेख, बिलाल चाऊस, आरेफ तांबोळी, रहीम शेख, साहिल शेख, शोएब काझी, निहाल काझी, सैफ शेख, मुजाहिद काझी आदींसह तब्बल ४० कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेश केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी होते. व्यासपीठावर नेताजी पाटील, इंद्रजीत देवकते, ॲड. नितीन भोसले, सुनील काकडे, युवराज नळे, मधुकर तावडे, राजसिंहा राजेनिंबाळकर, संपत डोके, अभय इंगळे, अमित शिंदे, अक्षय ढोबळे, नितीन शेरखाने आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले, "धाराशिव नगरपालिका भाजपाच्या पूर्ण बहुमताने ताब्यात आली पाहिजे. नगराध्यक्षपद भाजपाचा गमछा घालणाऱ्या कार्यकर्त्यालाच मिळाले पाहिजे. भाजपात येणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल."

मल्हार पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, "नगरपालिका निवडणुकीसाठी प्रत्येकाने आपला प्रभाग मजबूत करावा. सर्वेक्षणानंतर जनतेचा कौल पाहून उमेदवारी दिली जाईल. प्रभागनिहाय दरबार घेण्यात येतील. मात्र तुम्ही मेहनत करा, चांगले काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत."

दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या विकासकेंद्रित नेतृत्वामुळे तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संघटन कौशल्यामुळे उद्धव ठाकरे सेनेतील असंतोष वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते भाजपकडे आकर्षित झाले आहेत. या पक्षप्रवेशामुळे भाजपाची धाराशिवमधील ताकद आणखी वाढली असून, आगामी नगरपालिका निवडणुकीत पक्षाला मोठा फायदा होईल, असा भाजपच्या गोटात विश्वास व्यक्त केला जात आहे.

या कार्यक्रमाला फरहान काझी, आरिफ पठाण, प्रा. पटेल, मेहमूद मुजावर, जाकीर पठाण, फहाद सिद्दिकी, फिरोज पठाण, रय्यान रझवी, रमजान तांबोळी, तौफिक मुजावर, कावेर शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement