धाराशिव – शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, 8 जून ते 10 जून 2025 दरम्यान तीन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या घटनांनी शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तपास सुरु आहे.
पहिली घटना आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीत 8 जून रोजी घडली. फिर्यादी बालपीर रमजान मुजावर (वय 32, रा. सारोळा बु., ता. जि. धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची अंदाजे 40,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची सुजुकी एक्सेस 125 ही दुचाकी (क्र. MH-25-BC-3476) धाराशिव कोर्ट परिसरातून सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यांनी 2 जुलै रोजी तक्रार दिल्यानंतर भा.दं.वि. कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरी घटना धाराशिव शहर पोलीस ठाणे हद्दीत 10 जून रोजी घडली. फिर्यादी सचिन साहेबराव साळुंके (वय 42, रा. गुजनूर, ता. तुळजापूर) यांची होंडा शाईन कंपनीची अंदाजे 20,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची दुचाकी (क्र. MH-25-AE-7393) भाजप भवन समोरून दुपारी 3 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान चोरीला गेली. त्यांनी 2 जुलै रोजी तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तिसरी घटना 27 मे रोजी आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. समाधान धनाजी बांगर (वय 29, रा. बांगरवाडी, ता. कळंब) यांच्या हिरो एचएफ डिलक्स कंपनीच्या अंदाजे 20,000 रुपये किमतीच्या लाल रंगाच्या दुचाकी (क्र. MH-13-CF-0224) चा अपहार सेंट्रल बिल्डिंग समोरून दुपारी 1.30 ते 2.30 दरम्यान करण्यात आला. याबाबतची तक्रारही 2 जुलै रोजी दाखल झाली आहे.
सर्व घटनांमध्ये भा.दं.वि. कलम 379 अन्वये गुन्हे दाखल असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. शहरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांनी वाहनांची योग्य सुरक्षा व्यवस्था करावी, तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments