Ad Code

Responsive Advertisement

"मराठा आरक्षण लढ्यास मुस्लिम बांधवांचा हातभार; सामाजिक ऐक्याचे दर्शन"

"मराठा आरक्षण लढ्यास  मुस्लिम बांधवांचा हातभार; सामाजिक ऐक्याचे दर्शन"

वाशी जि धाराशिव (शहाबाज काजी वाशी तालुका प्रतिनिधी) :
मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु असून, आता वाशी तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवत मराठा समाजाच्या पाठिशी उभे राहत मदतीचा हात पुढे केला आहे.

आज वाशी येथून वाहनांमधून पाण्याचे बॉक्स मोठ्या संख्येने मराठा स्वयंसेवकांकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी वाशीतील मुस्लिम बांधवांसह मराठा समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे आंदोलनकर्त्यांना दिलासा मिळाला असून, समाजात बंधुभाव आणि ऐक्याची जाणीव दृढ झाली आहे.

दरम्यान, मराठा समाजाकडून आरक्षणाच्या चळवळीसाठी तालुक्यात भव्य शिदोरीचे आयोजनही करण्यात आले. विविध गावांतून तब्बल दहा हजाराहून अधिक भाकरी, चटणी, मिरची व लोणचं जमा करून मुंबईतील आझाद मैदानावर धडक मारलेल्या मराठा बांधवांच्या आंदोलनस्थळी रवाना करण्यात आली.

मराठा समाजाच्या स्वयंसेवकांनी ही शिदोरी मोठ्या उत्साहात मुंबईकडे रवाना केली. या उपक्रमामुळे मराठा आरक्षण चळवळीला बळ मिळाले असून, सर्व समाजामध्ये ऐक्य, भाईचारा आणि आंदोलनाच्या यशाबाबत दृढ निश्चय दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement