Ad Code

Responsive Advertisement

सच्चा पत्रकार हुकूमत मुलानी यांचे आकस्मिक निधन; पत्रकारिता क्षेत्राला मोठी पोकळी

सच्चा पत्रकार हुकूमत मुलानी यांचे आकस्मिक निधन; पत्रकारिता क्षेत्राला मोठी पोकळी

धाराशिव – मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. ‘टुडे समाचार’ युट्यूब चॅनलचे संपादक आणि जिल्ह्यातील सच्चे पत्रकार हुकूमत मुलानी (वय ५६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले.

हुकूमत मुलानी हे बातमी मिळताच तातडीने घटनास्थळी पोहोचून सत्य मांडणारे, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात धावणारे एक परिपूर्ण आणि तळमळीचे पत्रकार होते. लोकांचे प्रश्न निडरपणे पुढे मांडणे, समाजातील सत्य परिस्थिती प्रकाशझोतात आणणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आपुलकीने बोलणारा स्वभाव आणि कामाशी प्रामाणिक नाते यामुळे त्यांनी पत्रकारितेत एक वेगळी छाप उमटवली होती.

त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली असून सहकारी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
हुकूमत भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐🙏

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement