Ad Code

Responsive Advertisement

AIMIM तर्फे धाराशिवमध्ये जिल्हा आढावा बैठक व जाहीर सभा

एआयएमआयएमतर्फे धाराशिवमध्ये जिल्हा आढावा बैठक व जाहीर सभा
धाराशिव, दि. 18 सप्टेंबर (प्रतिनिधी):
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्यावतीने येत्या रविवार, दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी धाराशिव येथे जिल्हा आढावा बैठक व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही बैठक व सभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली असून, कार्यक्रमाचे ठिकाण धाराशिव येथील रेस्ट हाऊस असेल. सकाळी 10 वाजल्यापासून दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख पाहुणे

या बैठकीसाठी पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये –

1. सय्यद मोईन – माजी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
2. समीर साजिद बिल्डर – महाराष्ट्र प्रदेश सचिव
3. फारुख शब्दी (मुंबई अध्यक्ष)

वरील नेते रविवारी सकाळपासून धाराशिवमध्ये दाखल होऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाज, पक्षविस्तार, तसेच आगामी निवडणुका याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. AIMIM चे राज्यस्तरीय नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, सार्वजनिक सभेत स्थानिक प्रश्न आणि पक्षाची आगामी भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

धाराशिव (उस्मानाबाद) Aimim टीम यांनी दिलेल्या पत्रकात सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement