Ad Code

Responsive Advertisement

धाराशिवचे शामशोद्दीन शेख यांची सहकार सेनेच्या मराठवाडा सचिवपदी निवड

धाराशिवचे शामशोद्दीन शेख यांची सहकार सेनेच्या मराठवाडा सचिवपदी निवड

धाराशिव (शेख जाफरोद्दीन रब्बानी): धाराशिव शहराचे सुपुत्र आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते श्री. शामशोद्दीन शेख यांची सहकार सेना (शिवसेना प्रेरित) या संघटनेच्या मराठवाडा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. सहकार सेनेचे अध्यक्ष तसेच माजी राज्य मंत्री खासदार आनंदराव अडसूळ यांनी ही नियुक्ती अधिकृत पत्राद्वारे जाहीर केली.

ही नियुक्ती मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याचे पत्रात नमूद आहे. श्री. शेख यांच्या सामाजिक कार्य, संघटन कौशल्य आणि सहकार क्षेत्रातील सक्रियतेचा विचार करून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व विचारसरणी व सहकार चळवळीच्या बळकटीसाठी तुम्ही योगदान द्यावे, अशी अपेक्षा आहे.” तसेच मराठवाडा विभागात सहकार सेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल धाराशिव शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संस्थांनी श्री. शामशोद्दीन शेख यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement