Ad Code

Responsive Advertisement

बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी

बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी

आपसातील धार्मिक सलोखा कायम राहील - आमदार कैलास पाटील

ईद निमित्त मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटुंबांना साहित्य वाटप

धाराशिव, दि. 29 -
पवित्र रमजान महिन्यानिमित्त बहुजन योद्धा सामाजिक संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मुस्लिम बांधवांसाठी शुक्रवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज चौपाटी धनंजय शिंगाडे यांचे कार्यालयात इफ्तार पार्टी देण्यात आली. यावेळी सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धाराशिव - कळंब विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांनी देखील इफ्तार पार्टीत सहभागी होऊन रमजान ईदच्या निमित्ताने सदिच्छा व्यक्त केल्या. 
इफ्तार पार्टीत मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना करून ‘बहुजन योद्धा सामाजिक संघटनेसाठी’ दुआ मागितली. तर समी कव्वाल यांनी अभंग व कवाली सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

आमदार कैलास पाटील म्हणाले की, जगात आणि देशात पवित्र रमजान ईदचा सण हा एकात्मतेचा संदेश देणारा आणि आपसातील बंधुभाव कायम राखणारा आहे. सध्या देशात सुरू असलेली परिस्थिती लक्षात घेता धाराशिव जिल्ह्यात बंधुभाव आणि सलोखा कायम आहे. यापुढेही कायम राहील, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात. उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते. या महिन्यातील अखेरचे पाच ते सहा दिवस रात्रभर जागून प्रार्थना केली जाते. रात्रभर जागल्यानंतरही शेकडो मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीला उपस्थित होते. यावेळी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, ॲड. परवेज काझी, ॲड. जयंत जगदाळे, माजी उपनगराध्क्ष खलिफा कुरेशी, मुनीर कुरेशी, खलील सय्यद, मसूद शेख, अहमद चाऊस, इलियास आबदार, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद घुले, कार्याध्यक्ष संजय मुंडे, राजाभाऊ पवार, बाबा मुजावर, सुभाष पवार, नंदकुमार शेटे, पांडू भोसले, विशाल शिंगाडे, प्रसेंजीत शिंगाडे, सारीपुत शिंगाडे, बाळासाहेब शिंगाडे, लहू बनसोडे, बंटी शिंगाडे, सम्राट वाघमारे, संजय थोरात, सुरेश गवळी, समीयोद्दीन मशायक, सजियोद्दिन शेख, खलील पठाण, इलियास पिरजादे, बिलाल तांबोळी, तायीब मुजावर, कलीम मौलाना, इलियास मुजावर, इमाम कलीम पेंटर, कलीम मुजावर, नुरखा पठाण, जुल्फेखार काझी, मुसा आबदार, आदिल आबदार, अनिरुद्ध कावळे, बंडू आदरकर, सतीश कदम यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement