Ad Code

Responsive Advertisement

बिर्याणी भाई' हॉटेलकडून इस्रायली वस्तूंवर बहिष्कार; धाराशिवमध्ये अनोखी भूमिका


'बिर्याणी भाई' हॉटेलकडून इस्रायली वस्तूंवर बहिष्कार; धाराशिवमध्ये अनोखी भूमिका
धाराशिव , दि. १८ एप्रिल – धाराशिव शहरातील प्रसिद्ध 'बिर्याणी भाई' हॉटेलने इस्रायली उत्पादनांचा बहिष्कार करत सामाजिक जबाबदारीची भूमिका घेतली आहे. या हॉटेलचे मालक यांनी इस्रायली कंपनीचे शितपेय सार्वजनिकरित्या फेकून निषेध नोंदवला आणि यापुढे अशा कोणत्याही इस्रायली वस्तूंचा वापर किंवा विक्री न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

मालकांनी सांगितले की, "गेल्या वर्षभरापासून इस्रायलकडून गाझा पट्ट्यावर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे हजारो निरपराध लोकांचा मृत्यू झाला आहे आणि लाखो लोक बेघर झाले आहेत. अशा परिस्थितीत आम्ही शांततेच्या बाजूने उभे राहून इस्रायली कंपन्यांच्या उत्पादनांचा पूर्णतः बहिष्कार करत आहोत."

या भूमिकेचे अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. उस्मानाबादमध्ये अशा प्रकारचा पहिलाच ठोस निषेध असल्याने या कृतीची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.




Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement