Ad Code

Responsive Advertisement

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकाची अडीच लाख रुपयांची फसवणूक; पोलिसांकडून अजूनही कारवाई नाही

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकाची अडीच लाख रुपयांची फसवणूक; पोलिसांकडून अजूनही कारवाई नाही
वाशी (धाराशिव):
वाशी येथील मजरोद्दीन ताजुद्दीन मुजावर या युवकाची नोकरीचे आमिष दाखवून तब्बल अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून, संबंधित व्यक्ती विरोधात तक्रार दिल्यानंतरही पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी गंभीर माहिती समोर आली आहे.

मजरोद्दीन मुजावर हे बारावी विज्ञान पर्यंत शिक्षण घेतलेले असून सध्या B.Sc. च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे नोकरीची निकड असताना वाशी येथील रईसोद्दीन उर्फ नवाब हमीद काझी याने पोस्ट ऑफिस व आरोग्य खात्यात नोकरी लावतो असे सांगून अडीच लाख रुपये घेतले.

रक्कम वेगवेगळ्या माध्यमातून—बँक खात्यात, फोन पे व रोख स्वरूपात—देण्यात आली. यानंतर नागपूर येथे 'ट्रेनिंग'च्या नावाखाली फसवणूक करून, बनावट जॉइनिंग लेटर देण्यात आले. जेव्हा वाशी पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी केली, तेव्हा समजले की, लेटर बनावट असून संपूर्ण प्रकार फसवणुकीचा आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात SANDIP CHANDRKANT CHANDYKAR, 'विनोद सर', तसेच KBSS FOUNDATION नावाचे बोगस संस्थेचे नाव समोर आले असून, एकूणच रॅकेट कार्यरत असल्याचा संशय आहे.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी निवेदन देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने आता त्याच्या कुटुंबावर मानसिक तणाव वाढला आहे. व्याजाने पैसे उधार घेऊन दिले असल्यामुळे कुटुंबीयांवर आर्थिक बोजा पडला आहे.

तक्रारदाराने स्पष्टपणे सांगितले आहे की, "आम्हाला न्याय मिळाला नाही तर माझ्या कुटुंबावर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यास जबाबदार हे रॅकेट व त्यांच्याशी संलग्न असलेली मंडळी राहतील."

प्रशासन व पोलिसांकडून तातडीने याची गंभीर दखल घेऊन फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement