उमरगा (धाराशिव) – 22 जुलै 2025
उमरगा येथील Jio-BP Reliance पेट्रोल पंपावर डिझेल फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक रहिवासी सादिक टार्चे यांनी आरोप केला की त्यांच्या KIA Seltos गाडीमध्ये केवळ 50 लिटरची डिझेल टाकी असतानाही त्यामध्ये तब्बल 56.33 लिटर डिझेल भरल्याचा दावा पंप प्रशासनाने केला आहे.
पंप मशिनवरील माहिती व दिलेल्या कॅश मेमोप्रमाणे, डिझेलचा दर ₹91.42 प्रति लिटर होता आणि त्यावर एकूण ₹5149.69 एवढी रक्कम आकारण्यात आली. विशेष म्हणजे, इंधन भरल्यानंतर देखील गाडीत 10-12 लिटर डिझेल भरण्याची जागा उरली होती, असा गंभीर आरोप सादिक यांनी केला आहे.
या घटनेने गावात तीव्र संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी पंपाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. पंपवरील डिझेल मशीनची कॅलिब्रेशन तपासणी तातडीने व्हावी, अशी मागणी होत आहे.
ग्राहक सादिक यांचा सवाल थेट:
"माझ्या गाडीची टाकी 50 लिटरची असताना, 56 लिटर डिझेल कसं काय भरलं? मी फसवणुकीचा बळी ठरत नाही का?"
0 Comments