Ad Code

Responsive Advertisement

अवैध गुटखा विक्रीसाठी साठा ठेवणाऱ्यावर धाराशिवमध्ये गुन्हा दाखल ; आता मोठ्या माशांवर कारवाई कधी?"


अवैध गुटखा विक्रीसाठी साठा ठेवणाऱ्यावर धाराशिवमध्ये गुन्हा दाखल ; आता मोठ्या माशांवर कारवाई कधी?"

धाराशिव : महाराष्ट्र शासनाने गुटखा व तत्सम पदार्थांवर घातलेल्या बंदी आदेशाचा भंग करत विक्रीसाठी साठा करून ठेवणाऱ्या एका इसमाविरुद्ध धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी दयानंद सुनिल सोनटक्के (वय 38 वर्षे, रा. अगड गल्ली, धाराशिव) यांनी दिनांक 20 जुलै 2025 रोजी सायंकाळी 3.30 च्या सुमारास अगड गल्लीतील अंबिका ट्रेडर्स या ठिकाणी गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला अशा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जवळजवळ 18,418 रुपये किंमतीचा विक्रीसाठी बाळगला होता.

या कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा आयुक्त व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर माहिती अन्न सुरक्षा अधिकारी लातूर चार्ज धाराशिव येथील विठ्ठल सठवाजी लोंढे (वय 50 वर्षे) यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने याची तक्रार दाखल केली.

या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 123, 223, 274, 275 अन्वये तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या कलम 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement