धाराशिव (ता. ५ ऑगस्ट २०२५): महसूल विभागाच्या वतीने साजऱ्या होत असलेल्या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने नोंदणी व मुद्रांक विभाग, धाराशिव यांच्यातर्फे आयोजित आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशासकीय इमारत, पहिला मजला, धाराशिव येथे यशस्वीरित्या पार पडले.
सदर शिबिराचे उद्घाटन मा. श्री शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी धाराशिव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्री कल्याण कुलकर्णी, सह जिल्हा निबंधक धाराशिव, दुय्यम निबंधक श्री मंडलिक, श्री मादसवार, श्री नरसाळे, श्री राऊत, श्रीमती नागरगोजे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरात अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले व आरोग्य तपासणी करून घेतली. "रक्तदान हे महादान" या सामाजिक जाणिवेच्या भावनेने प्रेरित होऊन अनेकांनी स्वखुशीने रक्तदानात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. महसूल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आरोग्यविषयक जनजागृतीसह समाजप्रतीची बांधिलकी अधोरेखित झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजक व आरोग्य विभागाचे विशेष आभार मानले.
0 Comments